मुळा धरणातून आज पाणी सोडणार
By Admin | Published: August 5, 2016 11:34 PM2016-08-05T23:34:21+5:302016-08-05T23:43:12+5:30
बारागाव नांदुर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात समाधानकारक साठा झाल्याने शनिवारी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल,
बारागाव नांदुर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात समाधानकारक साठा झाल्याने शनिवारी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा असलेल्या मुळा धरणात २२ हजार ३५१ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे सायंकाळी सहा वाजता दहा हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़
गुरूवारी कोतुळ येथे केवळ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ २२ हजार ९९६ दलघफू पाणी साठा झाल्यानंतर मुळा नदी पात्रात पाणी सोडण्याचे निश्चित होणार होते़ शुक्रवारी दुपारी पाण्याची आवक ५ हजार ६३८ क्सुसेकने होती़ ती सायंकाळी दहा हजार क्युसेकपर्यंत गेली़ संभाव्य वाढ लक्षात घेता, शनिवारी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे़ त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर दिवसभर ढगाळ वातावरण होते़ हलक्या पावसाच्या सरीने हजेरी लावली़