टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:35 PM2017-12-04T18:35:05+5:302017-12-04T18:39:25+5:30
विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी व्यक्त केला.
शिर्डी : विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी व्यक्त केला.
ललिता बाबर यांनी सोमवारी (दि.४) पती संदीप भोसले यांच्यासह साई दरबारी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या सोबत पत्रकार बाळासाहेब काकडे, मनिषा काकडे उपस्थीत होते. साई दर्शनानंतर या दाम्पत्याने साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मीडियम शाळेत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खेळाला मोठे महत्व असून शासकीय सेवेत खेळाडुंसाठी पाच टक्के जागा राखीव असल्याची माहिती बाबर यांनी विद्यार्थ्यांना दिली. आपल्याला लहानपणी सुविधा नव्हत्या, असे सांगत सध्याच्या विद्यार्थ्यांनी मिळत असलेल्या सुविधांचा व चांगल्या शिक्षकांचा फायदा घेवून क्रीडा क्षेत्रात आपलं आयुष्य घडवा, असं आवाहन बाबर यांनी केले. शाळेच्या प्राचार्या शिल्पा वैद्य यांनी बाबर यांचा सत्कार केला. प्रास्तविक क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले. शकुंतला कदम यांनी विद्यार्थ्यांना बाबर यांच्या क्रीडा जीवनाचा परिचय करून दिला.