वडगावपान उपबाजार समितीत टोमॅटो लिलावाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:29+5:302021-05-28T04:17:29+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात टोमॅटो पिकविला जातो. सध्या टोमॅटोचा सिझन असून हा शेतमाल अत्यंत नाशवंत आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात टोमॅटो पिकविला जातो. सध्या टोमॅटोचा सिझन असून हा शेतमाल अत्यंत नाशवंत आहे. तो एक-दोन दिवसाच्या पुढे टोमॅटो टिकणे शक्य नाही. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यास परवानगी मिळावी, असे पत्र बाजार समितीचे सभापती शंकराव खेमनर यांनी जिल्हाधिकारी, सहकारी संस्थांचे जिल्हा निबंधक यांना पाठविले होते. त्यानुसार लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. मुख्य बाजार समितीमधील होणारे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. वडगावपान उपबाजार समितीत कांदा वगळता केवळ फळे व भाजीपाला लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करत लिलावाला परवानगी देण्यात आली आहे.
---------------------
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत टोमॅटो या शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीतपणे चालू झाली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी आणावे. गुरुवारी (दि. २७) उपबाजार समितीत ७६ जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी सर्व जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहेत.
- सतीश गुंजाळ, सचिव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर