कल चाचणीचे संकेतस्थळ ‘हँग’
By Admin | Published: April 25, 2016 11:15 PM2016-04-25T23:15:26+5:302016-04-25T23:20:22+5:30
अहमदनगर : दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
अहमदनगर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार फेबु्रवारी महिन्यात नगरसह राज्यात ही कल चाचणी झाली. या चाचणीचा निकाल सोमवारी संकेतस्थळावर जाहीर झाला. मात्र, दिवसभर हे संकेतस्थळ हँग होते. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे हाल झाले.
व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई यांनी राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे कल चाचणी घेतली. फेबु्रवारी महिन्यात १८ ते २७ तारखेदरम्यान, नगर जिल्ह्यातून जवळपास ७३ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने ही कल चाचणी दिली. त्यावेळीही व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई यांचे संकेतस्थळ हॅँग होते. यासंदर्भात जिल्ह्यातील शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघटना यांनी तक्रार केली होती. मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे झालेल्या चाचणीत विद्यार्थ्यांना १५२ प्रश्न विचारण्यात आले होते.
या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांचा पुढील कल निश्चित करण्यात आला आहे. या कल चाचणीचा वैयक्तिक निकाल सोमवारी दुपारी १ पासून आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. दुपारी १२ च्या दरम्यान, या संकेतस्थळावर ७ हजारांच्या जवळपास भेटी देणाऱ्यांची संख्या होती. मात्र, सायंकाळी ६ च्या दरम्यान, हा आकडा १ लाख ७० हजारांपर्यंत पोहचला. दिवसभर हे संकेतस्थळ हॅँग होते. दुपारनंतर काही ठिकाणी वैयक्तिक निकाल पहावसाय मिळाले असल्याची माहिती मिळाली.
(प्रतिनिधी)