मुसळधार पावसाने झोडपले; चापडगाव मंडळात एका दिवसात १७४ मि. मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:20 PM2020-09-26T12:20:16+5:302020-09-26T12:20:48+5:30
शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
शेवगाव : तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिकांचे मोेठे नुकसान झाले.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून तर शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला होता. ओढे, नाले, तळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
शेवगाव महसूल मंडलात एका दिवसात ९६, भातकुडगाव मंडलात १५२, चापडगाव १७४, एरंडगाव मंडलात ७० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाने शेतकºयांची मोठी दाणादाण उडाली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, तूर, कांदा पिके अतिपावसाने शेतातच सडली आहेत. या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.