पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:02 IST2020-01-24T14:01:49+5:302020-01-24T14:02:31+5:30
जामखेड शहरातील एका नराधमाने शेजारी राहणा-या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीस अटक
जामखेड : शहरातील एका नराधमाने शेजारी राहणा-या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, पाच वर्षांची चिमुरडी (दि.२१) शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी तीन वाजता शेजारी राहणारा आरोपी सचिन शालन पवार याच्या घरी गेली. यावेळी आरोपीने तिला बाजूच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादीला याबाबत कोणाला काही सांगू नका नाही तर जिवे मारेल अशी धमकी दिली. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पिडीत मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसानंतर फिर्याद दाखल केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहे.