साठ वर्षांच्या वृद्ध मजूर महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:38 PM2019-10-16T16:38:44+5:302019-10-16T16:40:22+5:30

अहमदनगर: नगर शहरातील झोपडपट्टीत राहणा-या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिचे दागिने व पैसे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़. मंगळवारी (दि़१५) सकाळी आठ वाजता बु-हाणनगर रोड परिसरात ही घटना घडली़.  या घटनेतील आरोपीला कोतवाली पोलीसांनी बुधवारी दुपारी अटक केली आहे़. 

Torture on a sixty-year-old working woman; The accused arrested | साठ वर्षांच्या वृद्ध मजूर महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक 

साठ वर्षांच्या वृद्ध मजूर महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक 

अहमदनगर: नगर शहरातील झोपडपट्टीत राहणा-या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिचे दागिने व पैसे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़. मंगळवारी (दि़१५) सकाळी आठ वाजता बु-हाणनगर रोड परिसरात ही घटना घडली़.  या घटनेतील आरोपीला कोतवाली पोलीसांनी बुधवारी दुपारी अटक केली आहे़. 
मुळची श्रीगोंदा तालुक्यातील एक वृद्ध महिला उपजविकेसाठी नगर शहरात वास्तव्यास आहे़.  सदर महिला मजुरीचे काम करते़. मंगळवारी (दि़१५) सकाळी शहरातील शनीचौकात कामाच्या प्रतिक्षेत ही महिला उभा होती़. याचवेळी जावेद शेख (रा़ बाबा बंगाली, नगर) हा तेथे आला़. त्याने भिंगार येथे माझ्याकडे काम असल्याचे सांगत सदर महिलेला त्याच्या मोटारसायकलवर बसविले़. शेख याने महिलेला भिंगार परिसरात बु-हाणनगर रोड परिसरातील निर्जन ठिकाणी नेले़. तेथेच्या तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची सोन्याची पोत व रोख पाच हजार रुपये हिसकावून नेले़. या घटनेने सदर महिलेने मंगळवारी रात्री उशीरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़. शेख याच्यावर लैंगिक अत्याचार, अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान  फिर्याद दाखल होताच पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरिक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला नगर शहरातून अटक केली़. 

Web Title: Torture on a sixty-year-old working woman; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.