अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ जण पोलीसांत हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:24 PM2018-05-21T14:24:56+5:302018-05-21T14:29:38+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी ४१ जण सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाले.

A total of 41 police personnel of NCP, present at the Ahmednagar Superintendent of Police | अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ जण पोलीसांत हजर

अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ जण पोलीसांत हजर

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी राष्ट्रवादीचे ४१ जण सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाले.
माजी नगरसेवक निखिल वारे, आरिफ शेख आदींचा यामध्ये समावेश आहे. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे सेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलीसांनी अधीक्षक कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलीसांनी ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ४४ जणांना अटक केली असून, त्यांना जामीनही मिळालेला आहे. सोमवारी पोलीसांत हजर झालेल्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
यामध्ये नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, शेख अरिफ रफियोद्दिन, माजी नगरसेवक निखिल वारे, अविनाश घुले, वैभव ढाकणे, माजी उपमहापौर दीपक सूळ या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अटक झालेल्या कार्यकर्त्यांची नावे अशी- महेश जयसिंग बुचडे, केरप्पा रामचंद्र हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद, अशोक शिवाजी रोकडे, आवी शंकर बत्तीन, सागर बबन शिंदे, धीरज बबनराव उकिर्डे, समद वहाब खान, सुनील नारायण त्रिंबके, बबलू बन्सी सूर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश टेकनदास मेहतानी, सुहास साहेबराव शिरसाठ, सैय्यद मतीन खोजा, प्रकाश बाबुराव भागानगरे, कुलदीप सुदाम भिंगारदिवे, दत्तात्रय लहानु तापकिरे, बाबासाहेब भाऊसाहेब गाडळकर, बीर उर्फ दिलदार सिंग अजय सिंग शेख, फारूक अब्दुल अजीज रंगरेज, चंद्रकांत महादेव औशिकर, अरविंद नारायण शिंदे, सत्यजित नंदू ढवण, वैभव कैलास जाधव, राहुल सतीश शर्मा, मयूर कन्हैय्यालाल बांगरे, किरण बाबासाहेब पिसोरे, घनश्याम दत्तात्रय बोडखे, बाबासाहेब कारभारी जपकर, राजेंद्र रामदास ससे, वैभव चंद्रकांत दारुणकर, अक्षय सतीश डाके, मयूर दिलीप कुलथे यांचा समावेश आहे.

Web Title: A total of 41 police personnel of NCP, present at the Ahmednagar Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.