प्रतिकात्मक प्रेतासमोर ग्रामीण डाक सेवकांनी फोडला टाहो : अकराव्या दिवशी बोंबाबोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:04 PM2018-06-01T18:04:44+5:302018-06-01T18:05:09+5:30
ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत घोषित करण्यात आले. मुख्य डाक कार्यालया समोर केंद्र सरकार व डाक विभागाच्या प्रतिकात्मक प्रेता समोर ग्रामिण डाक सेवकांनी टाहो फोडून बोंबा मारल्या.
अहमदनगर : ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत घोषित करण्यात आले. मुख्य डाक कार्यालया समोर केंद्र सरकार व डाक विभागाच्या प्रतिकात्मक प्रेता समोर ग्रामिण डाक सेवकांनी टाहो फोडून बोंबा मारल्या.
संपाचा दहावा दिवस उलटून देखील केंद्र सरकार व डाक विभाग ग्रामीण डाक सेवकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. तर त्यांच्या प्रतिकात्मक प्रेता समोर आंदोलकांनी बोंबा मारुन आपला संताप व्यक्त केला. तर मृतांचा दहावा व तेरावा देखील संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. डाक विभागाचे कामकाज केंद्र सरकारमार्फत चालून देखाल ग्रामीण डाक सेवकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली नाही. सदरील मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी मंगळवार दि. २२ मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. डाक विभागाची संपुर्ण धुरा ग्रामिण डाक सेवकांवर असून, त्यांनाच हक्का पासून वंचित ठेवण्यात आले आहे. आंदोलन चालू असताना पोस्टचा कारभार ग्रामीण डाक सेवकांअभावी संपुर्णत: ठप्प झाला असून, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंन्त संप चालूच राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पवार, सचिव एन.बी. जहागीरदार, कार्याध्यक्ष जी.टी. राजगुरु, अशोक बंडगर, लक्ष्मण बर्डे, विजयकुमार एरंडे, श्रीमंदिलकर टेके, सलिम शेख, भिमराज गीरमकर, दत्तात्रय कोकाटे, चंद्रकांत नेटके, सुदर्शन काकडे, खुडे काका, बी.डी. निंबाळकर, देवराम पालवे, क्षीरसागर, बाळासाहेब बनसोडे, टेके मॅडम, सुनिल शिंदे, संजय परभणे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक आंदोलनात सहभागी झाले होते.