कोरोनाच्या सावटाखाली नगरकरांनी उभारली गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:30 PM2020-03-25T12:30:19+5:302020-03-25T12:30:52+5:30
कोरानोच्या सावटाखाली नगरकरांनी यंदाची गुढी उभारून घरी थांबू या, कारोना मुक्तीचा संकल्प करू या, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावरून एकमेकांना दिले.
अहमदनगर: कोरानोच्या सावटाखाली नगरकरांनी यंदाची गुढी उभारून घरी थांबू या, कारोना मुक्तीचा संकल्प करू या, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावरून एकमेकांना दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे़ गेल्या दोन दिवसांपासून किरणा मालपासून ते फुले, फळ विक्रते शोधूनही सापडत नाहीत़ परिसर निर्मुनुष्य आहे़ नागरिक घरी बसवून आहेत़ पाडवा सणाला सर्वच बंद राहिल, या भितीने शहरातील नागरिकांनी रात्री दुकाने हुडकून काढली़ घाई गडबडीत जे मिळेल, आणले़ सकाळी कडूलिंबाचा ढगळा आणण्याला बाहेर जावे की नाही, अशा व्दिधा मनस्थित अनेक जण होते़ सण कुठलाही असो चितळे रस्ता विक्रेत्यांनी गजबजलेला असतो़ यंदा मात्र तिथेही गर्दी नव्हती़ सावेडीतील प्रोफेसर चौकात तर पाय ठेवायलाही जागा नसते़ मात्र हा चौक गुरुवारी निर्मनुष्य पहायला मिळाला़ नवीन वाहने खरेदीसाठी मनमाड व पुणे महामार्ग प्रसिध्द आहे़ अनेकांनी वाहन खरेदीला पाडव्या मुहर्त काढलेला होत़ा पण हा मुहुर्त त्यांना पुढे ढकलवा लागला़