मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात कालवतायत विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:55 AM2018-05-09T04:55:37+5:302018-05-09T04:56:04+5:30
मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत.
- भाऊसाहेब येवले
राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत.
धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईच्या बॉम्बे फिश मर्चंटस्चे दिलवार खान यांनी घेतला आहे. त्यांनी मासे पकडून विक्रीस नेण्यासाठी शंभरपेक्षा अधिक जणांना मासेमारीचे पास लोकांना दिले आहेत़ त्यांच्याकडून धरणाच्या पाण्यात मध्यरात्री विषारी औषध ओतले जाते. त्यामुळे मासे बेशुद्ध पडून किनाºयावर येऊन मृत्युमुखी पडत आहेत़
मृत्युमुखी पडलेले मासे सहज गोळा करून विक्रीसाठी दूर ठिकाणी पाठविले जात असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांनी केल्या आहेत. हे मासे खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
विषारी औषधांचा वापर बंद होण्यासाठी लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करु, अशी माहिती
मुळा धरणाचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. आमच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने स्टाफ नाही़ ५० किलोमीटरच्या पट्ट्यात सुरक्षा ठेवणे गरजेचे असल्याचेही बुधवंत यांनी सांगितले.