राहुरीतील रस्ता दुभाजकाच्या कामाला व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:22+5:302021-03-18T04:19:22+5:30
राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल इमारत ते डॉ. खुरुद दवाखान्यापर्यंत रस्ता दुभाजकाचे काम करण्यात येणार आहे. ...
राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल इमारत ते डॉ. खुरुद दवाखान्यापर्यंत रस्ता दुभाजकाचे काम करण्यात येणार आहे. या रस्ता दुभाजकाच्या कामाला येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
कॉलेज रोड, ब्लड बँक चौकाला ‘छत्रपती चौक’ हे नाव देण्यात आलेले आहे. या नावाची राहुरी नगरपालिकेने ‘छत्रपती चौक’ या नावाची दप्तरी नोंद लावावी. अन्य कोणतेही नाव या चौकाला देऊ नये, अशा आशयाचे निवेदनही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला दिले.
याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील, विजय कोहकडे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.
निवेदनावर भैय्यासाहेब शेळके, प्रभाकर ठोकळे, अरुण ताकटे, विलास धसाळ, प्रशांत हरिश्चंद्रे, राहुल वाघमारे, अविनाश शिंदे, रावसाहेब दातीर, अनिल क्षीरसागर, सागर ताकटे, धनंजय नरवडे, रामदास कटारे, भारत टेमक, मधुकर घाडगे, सोमनाथ धुमाळ, महेश नेहे यांच्या सह्या आहेत.
...
फोटो-१७राहुरी निवदेन
...
ओळी-राहुरी शहरातील रस्ता दुभाजकाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबतचे निवदेन पालिका प्रशासनाला देताना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, विजय कोहकडे, सुभाष पवार आदी.