वडापावला टाटा, परप्रांतीय युवकांनी सुरू केला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:28 PM2020-04-20T12:28:47+5:302020-04-20T12:30:14+5:30
कर्जत - पारंपरिक पद्धतीने आईस्क्रीम, वडापाव व्यवसायाला टाटा करत परप्रांतीय युवकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. समय सुचकतेने व्यावसायात बदल करून कुटुंबाला आधार देण्यासाठी धडपडणाऱ्या युवकाचे कौतुक होत आहे.
कर्जत - पारंपरिक पद्धतीने आईस्क्रीम, वडापाव व्यवसायाला टाटा करत परप्रांतीय युवकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. समय सुचकतेने व्यावसायात बदल करून कुटुंबाला आधार देण्यासाठी धडपडणाऱ्या युवकाचे कौतुक होत आहे.
सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातुन कर्जत येथे आलेले अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय हा वडापाव, आईस्क्रीम, कुल्फी, शरबत, तसेच इतर थंड पेय विक्रीचा गावोगावी वाडी वस्तीवर समारंभाच्या ठिकाणी, यात्रा, आठवडे बाजार अशा ठिकाणी व्यवसाय करत होते. मात्र गेल्या महिन्यापासून राज्यात देशात जगात कोरोना मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आठवडे बाजार, यात्रा जत्रा बंद पडल्या आहेत यामुळे वडिलोपार्जित व्यावसाय कोरोना मुळे बंद पडला आहे. मात्र कुटुंबाचा खर्च तर सुरू आहे मग घर चालवायचे कसे याची मोठी समस्या या परप्रांतीय कुटुंब चालकापुढे आली. कोणाकडे मदतीची अपेक्षा न ठेवता यातील युवकांनी आईस्क्रीम ऐवजी भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन तो कर्जत शहर उपनगरात घरोघरी फिरून विक्री करत आहेत. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे या युवकांनी कोरोना समस्येवर मात केली आहे. तसेच रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाले. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला व्यवसाय बंद झाला. नवा व्यवसाय सुरू करून प्रपंचाचा गाडा यशस्वीपणे हे युवक चालवत आहेत. सर्वच परप्रांतीय कुटुंबांनी काळाच्या ओघात व्यावसायात बदल केला याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाचे संकट देशावर आहे लाॅक डाऊन च्या काळात घरात बसुन बेरोजगार होण्य पेक्षा प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी हा सामुहिक निर्णय घेतला आहे
- प्रकाश विश्वकर्मा - कर्जत)
वडापाव व आईस्क्रीम ऐवजी भाजीपाला विक्री साठी घराबाहेर पडलेले युवक