भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 08:39 PM2018-01-19T20:39:08+5:302018-01-19T20:44:07+5:30

निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

The trailer created by BJP for the election of Bhima Koregaon | भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

श्रीगोंदा : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला होता. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर फेल झाले आहे. निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची कर्जमाफी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाचक अटी घालून शेतक-यांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. जनतेच्या पैशातून ही कर्जमाफी केली जाणार आहे.
कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, माजी खासदार दादापाटील शेळके आदी उपस्थित होते.

नगरचं पाणी लयभारी

पुणे जिल्ह्यातील नेत्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील नेत्यांना आयुष्य जादा आहे. आजही दादापाटील शेळके, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख यांच्यासारखे जेष्ठ पूर्ण क्षमतेने काम करतात. नगरचं पाणी लयभारी आहे, असा मिस्कील टिपण्णी हर्षवर्धन पाटील यांनी केल्यानंतर सभास्थानी एकच हशा पिकला.

पाचपुतेंनी घेतली नागवडेंची गळाभेट

राजकारणात माजी मंत्री बबनराव पाचपुते व राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यात टोकाचा संघर्ष सर्वस्त्रुत आहे. पण बबनराव पाचपुते यांनी सभास्थानी येऊन नागवडेंची गळाभेट घेतली. दोघांच्या गळाभेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Web Title: The trailer created by BJP for the election of Bhima Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.