जिल्ह्यातील ३३ न्यायाधीशांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 11:47 PM2016-04-27T23:47:40+5:302016-04-27T23:52:00+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांसह ३३ वरिष्ठ व कनिष्ठस्तर न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांसह ३३ वरिष्ठ व कनिष्ठस्तर न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल्यांच्या जागेवर तेवढेच न्यायाधीश नव्याने येणार आहेत. बदल्या झालेले सर्व न्यायाधीश न्यायालयीन सुट्टी संपल्यानंतर म्हणजे ६ जून रोजी बदली झालेल्या ठिकाणी पदभार घेणार आहेत.
जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. श्रीमती आर. व्ही. सावंत वाघुले (नगर ते सोलापूर), ए. डी. तनखीवाले (नगर ते मुंबई), एन. के. चव्हाण (श्रीरामपूर ते सातारा) यांच्या बदल्या झाल्या आहेत. आर. डी. पाटील (कोल्हापूर ते श्रीरामपूर), एस. पी. पोंक्षे (सोलापूर ते नगर), ए. एल. टिकले (सातारा ते नगर), एस. व्ही. माने (पुणे ते नगर) हे नवे जिल्हा न्यायाधीश असणार आहेत.
वरिष्ठ स्तर न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये सहा न्यायाधीशांचा समावेश आहे. पी. एस. विठ्ठलानी (वसमतनगर ते संगमनेर), के. व्ही. बोरा (इस्लामपूर ते संगमनेर), पी. पी. बनकर ( मुंबई ते नगर), आर. एस. आराध्ये (संगमनेर ते मुंबई), एस. एस. जगताप ( नगर ते नगर), एस. आर. पाटील (नगर ते इस्लामपूर).
फौजदारी आणि कनिष्ठस्तर न्यायालयातील २५ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये ए. ए. धुमकेकर (नगर ते पिंपरी चिंचवड), अभिजित कुलकर्णी (नगर ते परभणी), जे. एस. जगदाळे (पारनेर ते फलटण), आर. जे. पाटील (नगर ते सांगली), सतीश पाटील (शेवगाव ते भोर), आर. व्ही. पांडे (श्रीगोंदा ते परतूर), व्ही. डी. घागी (संगमनेर ते कारंजा), एम. एस. काकडे (कोपरगाव ते सातारा), बी. व्ही. बुरांडे (श्रीरामपूर ते माजलगाव), एम. डी. सैंदाणे (संगमनेर ते अकोला), एस. व्ही. देशमुख (श्रीरामपूर ते श्रीरामपूर) आदींचा बदल्यांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. जांभोरकर (पारनेर), एस. ए. बाफना (कोपरगाव), एस.जी. लांडगे (राहुरी), ओ. एस. पाटील (राहाता), पी. एन. कुलकर्णी (राहुरी), प्रशांत शिंदे (शेवगाव), एम. एन. पाटील (नेवासा), जे. आर. मुलानी (अकोले), एस. एस. परदेशी (शेवगाव), एन. ए. गुप्ता (नेवासा), एम. डी. नन्नवरे (नगर), व्ही. व्ही. खुलपे (राहाता), डी. व्ही. गवते (नगर) यांच्याही जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत.
(प्रतिनिधी)