वैचारिक समृद्धीमुळेच गावाचे परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:46 AM2020-12-11T04:46:45+5:302020-12-11T04:46:45+5:30
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारमधील परिवर्तन आर्थिक समृद्धीपेक्षाही वैचारिक समृद्धीने आले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ...
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारमधील परिवर्तन आर्थिक समृद्धीपेक्षाही वैचारिक समृद्धीने आले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केेेले. ढुमे यांनी गुरुवारी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते.
ढुमे म्हणाले, हिवरे बाजार गावाविषयी जे ऐकले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळेपण अनुभवयास मिळाले. अनेक गावांत आर्थिक समृद्धी आली. परंतु, तेथे गुन्हेगारीही वाढली. म्हणून वैचारिक समृद्धी हवी असेल तर पेनाची (शैक्षणिक ताकद) वाढली पाहिजे. त्याचवेळी बंदुकीची गरज संपेल. हिवरेबाजार येथील जलसंधारण, पाण्याचे नियोजन व दुग्धव्यवसायातील भरारी, पिकांचे नियोजन तसेच श्रमशक्तीची ताकद या जोरावरच या गावात वैचारिक समृद्धी आली आहे. त्यातूनच आर्थिक समृद्धी आली. या गावातील बदल म्हणजे आधुनिक काळातील भगीरथ प्रयत्न आहे. उद्याचा सक्षम भारत घडवायचा असेल तर हिवरेबाजारसारख्या आर्थिक समृद्धीबरोबरच वैचारिक समृद्धीची गरज आहे.
--
फोटो- १० हिवरेबाजार