संगमनेरमध्ये दुचाकीहून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूची वाहतूक
By शेखर पानसरे | Published: May 25, 2023 01:33 PM2023-05-25T13:33:19+5:302023-05-25T13:34:39+5:30
दिलीप सहादू शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉस्टेबल अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर (अहमदनगर) : दुचाकीहून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले. बुधवारी (दि. २४) सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास शहरालगत असलेल्या देवाचा मळा परिसरात केलेल्या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि दुचाकी वाहन असा एकूण २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिलीप सहादू शिंदे (वय ३४, रा. युनिकॉर्न सोसायटी, ए विंग, गुंजाळवाडी शिवार, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉस्टेबल अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. देवाचा मळा परिसरातून जाणाऱ्या एका दुचाकी चालकावर संशय आल्याने पोलिस कॉस्टेबल बर्डे यांनी त्याला थांबविले.
दुचाकीत (एम. एम. १५, जी. ९५६७) पोलिसांना प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखू आढळून आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलिस कॉस्टेबल बर्डे, पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे, पोलिस कॉस्टेबल शरद पवार, गणेश थोरात यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.