दुर्गम भागात वैद्यकीय पद्धतीपेक्षा उपचार महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:23+5:302020-12-31T04:21:23+5:30

डॉ. कोल्हे म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागात आजही वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. त्यामुळे तिथे जर कोणतीही उपचार सुविधा मिळत ...

Treatment in remote areas is more important than medical procedures | दुर्गम भागात वैद्यकीय पद्धतीपेक्षा उपचार महत्त्वाचे

दुर्गम भागात वैद्यकीय पद्धतीपेक्षा उपचार महत्त्वाचे

डॉ. कोल्हे म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागात आजही वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. त्यामुळे तिथे जर कोणतीही उपचार सुविधा मिळत असेल, तर तिचे स्वागतच केेले पाहिजे. शहरात मात्र हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा ठरत नाही. रुग्ण स्वत:च उपचार पद्धतीची निवड करू शकतील. मेळघाटमध्ये आरोग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत शेतीचा प्रयोग राबविण्यात आला. बहुपीक पद्धतीचा येथे स्वीकार करण्यात आला. बाजारातील विक्रीकरिता उत्पादन घेण्याऐवजी येथे आत्महत्या रोखण्याकरिता पीक पद्धती निश्चित केली. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्या तरी मेळघाटात त्या रोखण्यात यश आल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला. रुग्ण सेवेकरिता सतत उपलब्ध राहणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने आज मात्र जनतेत वैद्यकीय सेवेबद्दल काही गैरसमज निर्माण झाले. व्यावसायिक रूप आल्याने जनतेची डॉक्टरांबद्दल काहीशी वेगळी भावना झाली आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्र हे उदात्त आहे.

--------------

Web Title: Treatment in remote areas is more important than medical procedures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.