कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 04:41 PM2019-06-05T16:41:32+5:302019-06-05T16:41:39+5:30

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

Tree plantation in 79 villages in Koparga | कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

रियाज सय्यद

कोपरगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तालुका हरित करण्याचा संकल्प वनविभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्था तसेच इतर काही संघटनांनी सोडला आहे. त्यामुळे तालुका हरित होण्यास वेळ लागणार नाही. एकेकाळी तालुक्यात मुबलक पाणी व जंगल असल्याने त्याची ओळख ‘कॅलिफोर्निया’ म्हणून झाली होती. या भागात खासगी व सहकारी साखर कारखानदारी आली. त्यानंतरच्या काळात गोदावरी नदीचे पाणी आटले. जंगल तोड व अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत गेला. पर्यावरण रक्षणाऐवजी दुर्लक्ष झाले. गोदापात्रातून अमर्याद वाळू उपसा केला गेला. वृक्षांची बेसुमार कत्तल, सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आदी विविध गोष्टींमुळे पर्यावरणावर कुºहाड कोसळली. परिणामी प्रदूषण वाढून तापमानात कमालीचा बदल झाला. हवेतील प्राणवायू कमी होऊन गारवा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उष्णता प्रचंड वाढून तापमानाने उच्चांक गाठला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात महत्वाचा पर्याय आहे म्हणून वन विभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्थेसह विविध संघटनांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ हजार ३३ वृक्ष देऊन गावा-गावांमध्ये लिंब, बाभळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आंबा आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संवत्सरच्या रोपवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास निश्चितच चांगली मदत होणार आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच कचरा व सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. गोदावरी नदीतून वाळू उपसा झालेल्या ठिकाणी खडीचा बारीक चुरा टाकून भर टाकल्यास योग्य होईल. पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी, बेल-फळे आदींचा पर्यावरण रक्षणात मोठा वाटा आहे. त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. वाहनांचा धूर व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे. -संतोष जाधव, वन संरक्षक.

Web Title: Tree plantation in 79 villages in Koparga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.