पुनर्वसन केल्याशिवाय आदिवासींचे अतिक्रमण काढू नये; समाजबांधवांची मागणी
By रोहित टेके | Published: April 28, 2023 03:16 PM2023-04-28T15:16:53+5:302023-04-28T15:18:20+5:30
ही बाब अन्यायकारक असून शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी एकलव्य आदिवासी परिषदेचे अध्यक्ष मंगेश औताडे यांनी शुक्रवारी (दि.२८) तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देत केली आहे.
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : तालुक्यातील मुर्शदपूर हद्दीतील मांढरे वस्ती येथील एक व्यक्ती आदिवासी बहुजनांना न्यायालयात याचिका दाखल करून जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब अन्यायकारक असून शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी एकलव्य आदिवासी परिषदेचे अध्यक्ष मंगेश औताडे यांनी शुक्रवारी (दि.२८) तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देत केली आहे.
यावेळी मांढरे वस्ती येथील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह संसारपयोगी साहित्य आणून तहसीलदार बोरुडे यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. जर पुनर्वसन न करता मांढरे वस्ती येथील नागरिकांवर अन्याय करून अतिक्रमण काढल्यास एकलव्य आदिवासी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयच्या प्रांगणात बिऱ्हाड मांडून आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी मांढरे वस्ती येथील महीला पुरुष व बालगोपाळ मोठया संख्येने उपस्थित होते.