बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:35 PM2022-11-24T13:35:55+5:302022-11-24T13:36:41+5:30
आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला.
- हेमंत आवारी
अकोले (जि. अहमदनगर) : आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला. या हल्ल्यात महिला ठार झाली. महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे.
धरणग्रस्त आदिवासी महिला तुळसाबाई/ रत्नाबाई तुकाराम खडके (वय ६५) निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारात, सर्वे नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन मिळाली. जंगलात वस्ती आहे. पहाटे चार वाजता बिबट्याने हल्लाकरून बकरू ठार केले. नंतर वृध्देवर हल्लाकरून तीस जंगलात ४०० फुटांवर ओढत नेले. वृध्देच्या मानेवर जखम असून एक पाय व छातीचाभाग बिबट्याने तोडला आहे.
निळवंडे गावात चार दिवसांपुर्वी मध्य वस्तीत रात्री साडे नऊला बिबट्या घुसला होता. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा होता. तो बचावला, गायकवाड यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पसार झाला.
बिबट्याची दहशत निळवंडे कोकणेवाडी निंब्रळ परिसरात असून नागरीक भयभीत झाले आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे काय म्हणतात...
या परिसरात बिबट्या आहे. दोन तीन दिवसांपासून बिबट्या येत होता. छपराच्या घराला दरवाजा नसल्याने बिबट्याने घरात घुसून अपंग वृध्देवर हल्ला केला. नागरिकांनी सतर्क राहावे. पाळीव जनावरे बंदिस्त ठेवावे. आपली व घरातील लहान बालके वृध्द यांची काळजी घ्यावी.
निळवंडे धरणग्रस्त आदिवासी अपंग महिला रखमाबाई तुकाराम खडके वय ६५, निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारात, सर्वे नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन मिळाली.जंगलात वस्ती आहे. गुरूवारी पहाटे घटना घडली, पहाटे वृध्देचा आरोडल्याचा आवाज ऐकला पण वस्ती एकटी अंधारात पळणार कुठे ? ३०० मिटर ओढत नेले. शोध घेईपर्यंत बराच उशीर झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृध्देचा भाचा सुभाष विठ्ठल खडके, दगडू ठका पारधी यांनी सांगितले.
पहाटे चार वाजता बिबट्याने हल्लाकरून बकरू ठार केले. नंतर वृध्देवर हल्लाकरून तीस जंगलात ३०० मीटरच्या पुढे ओढत नेले. वृध्देच्या मानेवर जखम असून एक पाय व छातीचाभाग खाल्ला आहे.निळवंडे गावात चार दिवसांपुर्वी मध्य वस्तीत राञी साडे नऊ च्या बिबट्या घुसला होता. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा होता. तो बचावला, गायकवाड यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पसार झाला. बिबट्याची दहशत निळवंडे कोकणेवाडी निंब्रळ परिसरात असून नागरीक भयभीत झाले आहेत.