कवी वसंतराव दीक्षित यांना मसापातर्फे श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:13+5:302021-05-31T04:17:13+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे म्हणाले, कवी प्रा. दीक्षित यांनी आपल्या साहित्य चळवळीत ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे म्हणाले, कवी प्रा. दीक्षित यांनी आपल्या साहित्य चळवळीत अनेक कवींना मार्गदर्शन करून व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या स्मृती त्यांच्या कवितांच्या रूपाने आपल्या स्मरणात राहतील.
प्राचार्य सुधाकर कुऱ्हाडे म्हणाले, प्राध्यापक दीक्षित यांचा भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. नव कवींना दाद देऊन सातत्याने प्रोत्साहित केले.
साहित्य परिषदेच्या आधिदेशक प्रा. मेधाताई काळे, शाखा अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के, प्राचार्य विश्वासराव काळे, कार्याध्यक्ष किशोर मरकड, कार्यवाहक प्रा. चंद्रकांत जोशी, प्रकल्प प्रमुख प्रा. श्याम शिंदे यांनी दीक्षित यांच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी दीक्षित कुटुंबीयांच्या वतीने त्यांची कन्या कवयित्री माधुरी हुद्देदार, मेधा धर्माधिकारी, नुपूर नवले, जयेश दीक्षित यांनी कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. कवी चंद्रकांत पालवे यांनी दीक्षित यांच्या प्रकाशित कवितेचे वाचन केले. डॉक्टर रवींद्र धर्माधिकारी, नीरजा दीक्षित, नितीन अचारेकर, स्नेहल देशमुख, कवी शब्बीर शेख आदींसह अनेक सभासद व पदाधिकारी सहभागी झाले होते.