कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:26 AM2021-02-05T06:26:41+5:302021-02-05T06:26:41+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे ...

Troubled by the hen, now MSEDCL will cry | कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे आवर्तन मिळण्यास जवळपास मार्च महिना उजाडणार असल्यामुळे पाणी कमी पडू लागले आहे. जेमतेम पाण्यात पिके जगविण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरणने वसुलीचा बडगा उगारला आहे. फक्त रोहित्रे नाही, तर थेट वीज उपकेंद्रच वसुलीसाठी बंद करण्याची मोहीम महावितरणने सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाऊस चांगला झाला असला तरी जिरायत शेतीला कुकडीच्या पाण्याची गरज होती. परंतु, यावर्षी कुकडीचे पहिले आवर्तन एक फेब्रुवारीला सुरू झाले. आढळगाव परिसरातील गावांना पाणी मिळण्यास मार्च महिना उजाडणार आहे. बागायती शेतीलाही विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी पडू लागले आहे. जोरदार पाऊस होऊनही पाणी कमी पडू लागल्यामुळे बोअरवेल घेण्याऱ्या यंत्रांची धडधड कुकडी पट्ट्यात सुरू झाली आहे. रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऊस लागवडीही सुरू आहेत. सर्वत्र हिरवीगार परिसर असताना कुकडीचे लांबलेले आवर्तन आणि महावितरणच्या कृषिपंपांच्या वीज खंडित करण्याच्या निर्णयाचा फटका शेतीला बसणार आहे.

आढळगाव परिसरात महावितरणकडून थेट वीज उपकेंद्रच बंद करण्याच्या कृतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

----

नवीन कृषिपंप वीजजोडणी की तोडणी?

धोरण

नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तोडणी धोरण ठरले आहे.

Web Title: Troubled by the hen, now MSEDCL will cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.