उसाने भरलेला ट्रक उलटला, नागपुरचे दोघे जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:50 PM2019-12-21T22:50:54+5:302019-12-21T22:51:06+5:30

जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

Truck accident on Nagar-Manmad Road, two injured | उसाने भरलेला ट्रक उलटला, नागपुरचे दोघे जखमी  

उसाने भरलेला ट्रक उलटला, नागपुरचे दोघे जखमी  

कोपरगाव (जि. अहमदनगर) -  नगर - मनमाड महामार्गावर उसाने भरलेला ट्रक (एम. एच. १८ एम. २२५१ ) कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल साई टुरिस्ट समोर उलटला. यात रस्त्याने जाणारे दोन पादचारी दबल्याने गंभीर जखमी झाले आहे, तर चालकाने उडी मारल्याने त्याचाही जीव वाचला. 
ही दुर्घटना शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. जवळच असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत ऊसाखाली दबलेल्या जयेश गौतम (वय २३, रा. नागपूर) व संतोष सेलोकर ( वय ३०, रा. नागपूर )  यांना  बाहेर काढले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात संतोष याच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. हे दोघेही शहरातील सोमैय्या कॉलेज येथे पॉयथॉन लेक्चर देण्यासाठी आले होते. नागपूर येथे जाण्यासाठी निघाले असतांना रस्त्यात हा अपघात झाला. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून चालकास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Truck accident on Nagar-Manmad Road, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात