पोलीस असल्याचा बहाणा करुन ट्रक चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:30 AM2021-02-17T11:30:04+5:302021-02-17T11:30:34+5:30

आम्ही पोलीस आहोत. गाडीत काय माल भरला आहे? अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेंपोत चढले. यावेळी क्लीनर साईटच्या सीटखाली ठेवलेले २७ हजार १०० रुपये चोरून नेल्याची घटना ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर निमगाव खलू शिवारातील शांताई लॉन्स जवळ घडली.

The truck driver was robbed under the pretext of being a policeman | पोलीस असल्याचा बहाणा करुन ट्रक चालकास लुटले

पोलीस असल्याचा बहाणा करुन ट्रक चालकास लुटले

काष्टी : आम्ही पोलीस आहोत. गाडीत काय माल भरला आहे? अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेंपोत चढले. यावेळी क्लीनर साईटच्या सीटखाली ठेवलेले २७ हजार १०० रुपये चोरून नेल्याची घटना ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर निमगाव खलू शिवारातील शांताई लॉन्स जवळ घडली.

याबाबत ट्रकचालक लखन नायक (रा. बगवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश ) यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तीन अनोळखी इसमाच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

.सदर टेंपो हा नगर-दौंड रस्त्याने जात असताना बिगर नंबर प्लेटच्या अपाची दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमानी शांताई लॉन्सनजीक सदर टेंपो चालकाला दुचाकी आडवी लावत टेंपो थांबवण्यास सांगितला.

 दुचाकीवर आलेल्या त्या अनोळखी व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे सांगत चालक व क्लीनरला खाली बोलावले. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांना एका रजिस्टरवर सही करण्यास सांगितले. चालक व क्लीनरला बोलण्यात गुंतवून त्यातील एका इसमाने टेंपोमधील सीटखाली ठेवलेली २७  हजार १००रुपये रोख रक्कम चोरुन नेली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत. 

Web Title: The truck driver was robbed under the pretext of being a policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.