शिर्डीत जाणारच! तृप्ती देसाईंनी पोलिसांची नोटीस धुडकावत दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 09:02 PM2020-12-09T21:02:57+5:302020-12-09T21:03:40+5:30
शिर्डी देवस्थान प्रशासन आणि तृप्ती देसाई यांचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
अहमदनगर
"काहीही झाले तरी आम्ही शिर्डीत जाणारच", अशी ठाम भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावली आहे.
शिर्डी देवस्थान प्रशासन आणि तृप्ती देसाई यांचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. "साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये", असे आवाहन साई संस्थान केले आहे. यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. देसाई यांनी साई संस्थानने लावलेले हे फलक हटविण्याची मागणी केली आहे. साई संस्थानने फलक काढला नाही, तर आपण स्वत: जाऊन फलक हटविण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
तृप्ती देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुरुवारी त्या शिर्डीसाठी रवाना होणार आहेत. त्याआधीच शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना शिर्डीत प्रवेशाला बंदी घालत असल्याची नोटीस जारी केली आहे.