बनावट कागदपत्र तयार करुन ट्रस्टची जमीन हडपली; तत्कालीन नायब तहसीलदार, सबरजिस्ट्रारसह २४ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:38 PM2020-02-05T15:38:37+5:302020-02-05T15:39:48+5:30
बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
श्रीगोंदा : बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन सबरजिस्टर यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा एकूण २४ जणांविरोधात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गौतमचंद पुनमचंद बाठिया (रा. माणिकनगर, स्टेशनरोड, अनगर), सुभाष अर्जुन पवार (रा. बेलवंडी शुगर), नायब तहसीलदार महेश खेतमाळीस (रा.श्रीगोंदा), विजय मोरे (रा.श्रीगोंदा),रामदास थोरात (रा. लोणीव्यंकनाथ), राजू कोरे (रा.मढेवडगाव), चंद्रकांत शिनलकर (व्यवस्थापक बालाजी नागरी पतसंस्था, श्रीगोंदा), अन्सार शेख (रा श्रीगोंदा),अभिजित रेपाळे (रा.पारगाव सुद्रीक), अजित काकडे (रा.लोणीव्यंकनाथ, खरेदी घेणार), रामदास शेलार (रा.बेलवंडी), सतीश लगड (रा.कोळगाव), किशोर पवार (रा.बेलवंडी स्टेशन), नाना सय्यद (रा. रेल्वेस्टेशन,श्रीगोंदा), मोहन डांगे (रा.श्रीगोंदा कारखाना), सचिन भडांगे ( व्यवस्थापक श्रीगोंदा-आयडीबीआय बँक),बी डी पानसरे (कामगार तलाठी,बेलवंडी), हमशोद्दीन शेख(मंडलाधिकारी बेलवंडी),पांडुरंग निंभोरे (रा. घोटवी, विलास म्हस्के (रा.लोणीव्यंकनाथ), राजेंद्र क्षीरसागर (रा.श्रीगोंदा), अजित ओसवाल (आयडीबीआय बँक, श्रीगोंदा), श्रीगोंदा सबरजिस्टर (३ डिसेंबर २०१५ रोजी दाखल करण्यात आला आहे.
या सर्व लोकांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टी मयत आहेत हे माहिती असून सुद्धा मयत ट्रस्टीच्या जागी दुसºयालाच उभे करून बनावट बेकायदेशीर दस्तऐवज तयार केले. बनावट ओळखपत्र, बोगस सह्या व अंगठ्याच्या आधारे सदर ट्रस्टची गट नं ७२८ मधील जमीन बळकावून फिर्यादी व ट्रस्टची फसवणूक करण्यात आली आहे, असे ढमढेरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.
....