जिल्हा बँकेची करजगांव शाखा फोडण्याचा प्रयत्न : गावात तीन-चार ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:24 PM2018-07-27T12:24:15+5:302018-07-27T12:24:45+5:30
तालुक्यातील करजगांव येथे गुरुवारी रात्री जिल्हा बँकेची शाखेचा दरवाजा तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे. बँकेतील सीसीटीव्हीचे दोन कँमेरे काढून ठेवले. संगणक,विजेची व सायरनची केबल चोरट्यांनी तोडली.
नेवासा : तालुक्यातील करजगांव येथे गुरुवारी रात्री जिल्हा बँकेची शाखेचा दरवाजा तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे. बँकेतील सीसीटीव्हीचे दोन कँमेरे काढून ठेवले. संगणक,विजेची व सायरनची केबल चोरट्यांनी तोडली.
मात्र तिजोरिचा सायरन वाजल्यामुळे चोरटे पसार झाले. मच्छिंद्र टेमक सेवा संस्थेचा दरवाजा तोडून कपाटातील व इतर ठिकाणची कागदपत्रे उचकली. माऊली ज्वेलर्स व सत्यम ज्वेलर्सचे कुलूप तोडून नथ, मुरणी व किरकोळ रक्कम असा दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. पहाटे साडेचारच्या सुमारास फुलसौंदर वस्तीवरील अरुण हरिभाऊ जगताप यांच्या घरात चोरटे गेले असता जगताप यांची आई जाग्या होत्या. त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत एक पेटी उघडून त्यातील पाच-सहा ग्रॅम सोन्याचे मनी, रक्कम व एक पेटी बरोबर घेऊन बाहेरून दरवाजा लावत चोर पसार झाले. दोन चोरापैकी एकाने तोंडाला काळा रुमाल बांधलेला असल्याची माहिती सुमन जगताप यांनी दिली. चोरी झाल्याची माहिती पोलीस पाटील प्रकाश मोरे व जिल्हा बँक शाखेचे व्यवस्थापक गायकवाड यांनी सोनई पोलिसांनी दिली.
सकाळी सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, बीट हवालदार भिंगारदिवे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. दुपारी श्वान पथक येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.