दावणीला चारा देण्यासाठी प्रयत्न करू : परिवहन मंत्री दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 07:11 PM2019-06-09T19:11:06+5:302019-06-09T19:11:51+5:30

दुष्कााळाची तीव्रता वाढली आणि आचारसंहिता लागली यामुळे दुष्काळात होरपळणा-या शेतक-्यांच्या मदतीला येता आले नाही हे आमच्या राज्यकर्त्याचे दुदैव आहे

Try to give fodder to DAVA: Transport Minister Diwakar Rao | दावणीला चारा देण्यासाठी प्रयत्न करू : परिवहन मंत्री दिवाकर रावते

दावणीला चारा देण्यासाठी प्रयत्न करू : परिवहन मंत्री दिवाकर रावते

केडगाव : दुष्कााळाची तीव्रता वाढली आणि आचारसंहिता लागली यामुळे दुष्काळात होरपळणा-या शेतक-्यांच्या मदतीला येता आले नाही हे आमच्या राज्यकर्त्याचे दुदैव आहे. पाऊस लांबला तर शेतक-यांच्या दावणीला चारा देण्याबाबत विधानसभेत प्रस्ताव मांडू असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
रावते यांच्या हस्ते नगर तालुक्यातील अकोळनेर, खंडाळा येथील छावणीतील शेतक-यांना गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. रावते यांनी अकोळनेर येथील जनावरांच्या छावणीस भेट दिली. यावेळी राज्य विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, माजी राज्यमंत्री अनिल राठोड, संदेश कार्ले, रामदास भोर, तहसीलदार रोहिणी न-हे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, प्रभारी गट विकास अधिकारी वसंतराव गारुडकर उपस्थित होते.
रावते म्हणाले, दुष्काळ हा खरीप हंगाम संपल्यानंतर म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात दुष्काळाबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. पहिल्या जनावरांच्या छावण्या लवकर सुरु झाल्या आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्यावर नगर, मराठवाडा अवलंबून असतो. यावेळी नाशिक जिल्हयात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. छावणीतील जनावरांच्या चारा रक्कमेत वाढ करण्यात आली व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. आचारसंहिता संपल्यावर छावणतील जनवारांसाठी मुक्कामास असलेल्या शेतक-यांना मदत म्हणून गहू 10 किलो, तांदूळ 5 किलो व डाळ 1 किलो धान्याचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच अकोळनेर व खंडाळा येथील शेतकरी व महिलांशी रावते यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमास अकोळनेर व खंडाळा छावणीतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Try to give fodder to DAVA: Transport Minister Diwakar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.