अण्णा हजारेंचे मन वळविण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसह भाजप नेते राळेगणसिध्दीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:24 PM2021-01-29T16:24:29+5:302021-01-29T16:25:27+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिध्दीत दाखल झाले आहेत.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिध्दीत दाखल झाले आहेत.
३० जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषणास बसणार आहेत. स्वामीनाथन आयोगाचे अंमलबजावणी करा, तिनही कृषी कायदे रद्द करा आदी अण्णा हजारे यांच्या मागण्या आहेत. याबाबत अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना अनेक वेळा याबाबत पत्र लिहले आहे. या मागण्यांसाठी अण्णांनी दिल्लीत उपोेषणाचा इशारा दिला होता. परंतु तेथेही अण्णांना उपोषणास परवानगी दिली नाही. यामुळे अण्णांनी ३० जानेवारीपासून महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांचे मन वळविण्यासाठी भाजप नेते शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची भेट घेतली. सर्व नेत्यांनी अण्णांच्या प्रकृतीची िवचारपूस करुन त्यांच्याशी चचार् केली. अजून या बैठकीचा तपशील मिळू शकला नाही.