तुकाराम गडाख यांच्या ‘एंट्री’ने सोनईच्या लढती लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:44+5:302021-01-08T05:03:44+5:30

नेवासा : सोनई (ता. नेवासा) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाच्या विरोधात माजी खासदार तुकाराम गडाख यांनी दंड ...

Tukaram Gadakh's 'entry' made Sonai's fight stand out | तुकाराम गडाख यांच्या ‘एंट्री’ने सोनईच्या लढती लक्षवेधी

तुकाराम गडाख यांच्या ‘एंट्री’ने सोनईच्या लढती लक्षवेधी

नेवासा : सोनई (ता. नेवासा) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाच्या विरोधात माजी खासदार तुकाराम गडाख यांनी दंड थोपटले आहेत. त्यांच्या ‘एंट्री’ने येथील लढतींकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी सोनईची ग्रामपंचायत माजी खासदार तुकाराम गडाख यांच्याच ताब्यात होती. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीत त्यांचेच बहुमत असायचे. मात्र त्यांची एक संस्था अडचणीत आल्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र, आता सोनई ग्रामपंचायतीसाठी त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

जलसंधारण मंत्री गडाख यांच्या गटाच्या विरोधात मागील दोन पंचवार्षिक निवडणूक लढणाऱ्या प्रकाश शेटे यांच्या गटाला माजी खासदार तुकाराम गडाख ताकद देणार आहेत. त्यांनी हनुमानवाडी, खाण-झोपडपट्टी, दरंदले गल्ली, खोसे वस्तीला भेटी दिल्या. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांची सभा होणार असल्याचे संतोष तेलोरे यांनी सांगितले.

---

लोकशाहीत विरोधकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. सत्ताधारी मंडळावर नियंत्रण नसल्याने गावाचा बोजवारा उडाला आहे. तो विरोध संपला तर नवा विरोधक तयार व्हायला दहा वर्षे लागतात. विरोध संपू नये म्हणून पुढे आलो आहे.

-तुकाराम गडाख,

माजी खासदार

Web Title: Tukaram Gadakh's 'entry' made Sonai's fight stand out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.