नगरमध्ये तुळजाभवानीच्या पलंगाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:00 PM2019-09-28T14:00:42+5:302019-09-28T14:01:21+5:30
नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे शुक्रवारी निंबळक येथून सावेडीतील बालिकाश्रम रोड परिसरात आगमन झाले़ ताठेमळा येथील मुक्कामानंतर पलंगाची शनिवारी सिद्धार्थनगर, गवळीवाडा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़
अहमदनगर: नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे शुक्रवारी निंबळक येथून सावेडीतील बालिकाश्रम रोड परिसरात आगमन झाले़ ताठेमळा येथील मुक्कामानंतर पलंगाची शनिवारी सिद्धार्थनगर, गवळीवाडा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़
शुक्रवारी रात्री ताठेमळ्यात गोंधळीचा कार्यक्रम झाला़ ही पालखी शनिवारी नालेगाव येथील नवग्रह मंदिरात मुक्कामी राहणार आहे़ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात तुळजापूरचा समावेश आहे़ मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा शेकडो वर्षांपासून रितीरिवाजाप्रमाणे सुरू आहेत़ तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव, गणेश व उमेश पलंगे हे मुख्य मानकरी असून नगर शहरातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी आहेत. याबाबत सांगताना गणेश पलंगे म्हणाले, पलंगे कुटुंबीयांकडे पलंग बनविण्याचा मान आहे. त्यांची १५ वी पिढी या परंपरेत कार्यरत आहे़ कातीव कामातून आणि नैसर्गिक रंगाच्या लेपनातून हा पलंग दरवर्षी नवीन बनवला जातो. चार पाय, छत,आणि सहा कळस तसेच पलंगावरील पिवळा रंग भंडाºयाचा, हिरवा रंग देवीच्या बांगड्यांचा तर लाल रंग साडीचे प्रतीक म्हणून दिला जातो. हा रंग देण्यासाठी लाख गरम करून त्यामध्ये नैसर्गिक रंग मिसळविले जातात़