पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी तुरकणे, उपाध्यक्षपदी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:47+5:302021-03-08T04:20:47+5:30

शिर्डी : राहाता तालुका पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी संजय तुरकणे तर सचिवपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. ...

Turkane as president of Progressive Non-Progressive Association, Pawar as vice president | पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी तुरकणे, उपाध्यक्षपदी पवार

पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी तुरकणे, उपाध्यक्षपदी पवार

शिर्डी : राहाता तालुका पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी संजय तुरकणे तर सचिवपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.

शारदा विद्यामंदिर, राहाता येथे नुकतीच अहमदनगर जिल्हा पुरोगामी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या बैठकीला शिक्षकेतर संघटनेचे मार्गदर्शक समशेर पठाण, पुरोगामी शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे, जिल्हा उपाध्यक्ष परशराम वेताळ, किशोर बरकडे, जिल्हा सचिव भाऊसाहेब धनवटे व महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी छत्रपती शंभूराजे विद्यालय, पिंपळवाडी येथील संजय तुरकणे यांची अध्यक्ष म्हणून तर के. वाय. गाडेकर विद्यालय, राहाता येथील गणेश पवार यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी सुनील आदमाने व कैलास शिंदे, खजिनदारपदी राजूभाई सय्यद तर सदस्य म्हणून आप्पासाहेब राहणे, प्रशांत गायकवाड, रामदास खरात, धनंजय सांबारे, नारायण गोरे, सुनील क्षीरसागर. महिला प्रतिनिधी म्हणून सुनीता दवंडे, वाणी ताई यांची निवड करण्यात आली. यावेळी सादिक सय्यद, राजू कुलकर्णी, सुशील पिपाडा, मोईन काजी, सोमनाथ झडे, अशोक वाणी आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Turkane as president of Progressive Non-Progressive Association, Pawar as vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.