कुरणवाडीची पाणी योजना बंद
By Admin | Published: May 19, 2014 11:35 PM2014-05-19T23:35:19+5:302024-06-09T17:52:48+5:30
राहुरी : राहुरी तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागातील कुरणवाडी १९ गाव पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून बंद पडल्याने गावकर्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे़
राहुरी : राहुरी तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागातील कुरणवाडी १९ गाव पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून बंद पडल्याने गावकर्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे़ वीजबिल थकल्याने महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने ही वेळ आली आहे. कुरणवाडी पाणी योजना थेट मुळा धरणातून कार्यान्वीत करण्यात आली आहे़ योजनेकडे महावितरणची १७ लाख रूपयांची थकबाकी आहे़ पाणी पुरवठा योजना त्यापैकी साडेतीन लाख रूपये पहिल्या टप्प्यात भरण्यास तयार होते़ मात्र सर्व रक्कम एकाच वेळी भरण्याचा आग्रह महावितरणने धरला़ कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने कुरणवाडी पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केल्याने गावकर्यांबरोबरच जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ टप्प्याटप्प्याने बील भरण्याचे साकडे कुरणवाडी समितीच्या पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना घातले़ मात्र अधिकार्यांनी शासनाकडे बोट दाखविले़ आम्हाला बील वसूल करण्याच्या सूचना असून संपूर्ण बील भरल्याशिवाय विज पुरवठा सुरू करता येणार नाही, अशी भूमिका अधिकार्यांनी घेतली़ गुहा, गणेगाव, चिंचविहिरे, कणगर खुर्द, कणगर बुदु्रक, वडनेर ताहाराबाद, म्हैसगाव, मल्हारवाडी, घोरपडवाडी, मोमीन आखाडा आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ मध्यंतरी पाणी पुरवठा योजना बंद पडली असताना प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता़ त्यानंतर पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती़ (तालुका प्रतिनिधी) पाणीयोजना जि.प.ने चालवावी कुरणवाडी पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने चालविण्यास घ्यावी़ घोसपुरी, मिरी, तिसगाव, शेवगाव, पाथर्डी, बुºहाणनगर या पाणी पुरवठा योजनेप्रमाणे जिल्हा परिषदेने ५० टक्के अनुदान महावितरणकडे जमा करावे़ महावितरणकडून पाणी पुरवठा योजनेस व्यापारी पध्दतीने वीज दर आकारला जातो़ त्याऐवजी शेती पध्दतीनुसार वीज दर आकारण्यात यावा़ - अमोल भनगडे, अध्यक्ष कु रणवाडी पाणी योजना