बारा दिव्यांगांनी केली किल्ले कोरीगड भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:23+5:302021-09-22T04:24:23+5:30
गड-किल्ल्यांच्या भटकंतीची आवड असलेल्या महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी १९ सप्टेंबर रोजी किल्ले कोरीगड भटकंतीचे आयोजन शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. पावसाळी ...
गड-किल्ल्यांच्या भटकंतीची आवड असलेल्या महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी १९ सप्टेंबर रोजी किल्ले कोरीगड भटकंतीचे आयोजन शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. पावसाळी जंगली गोरखगड किल्ल्याच्या मोहिमेनंतर लोणावळा परिसरातील कोरीगड मोहिमेत राज्यातील १२ दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अकोले येथील पंचायत समिती शिक्षण विभागात सेवेत असलेल्या केशव भांगरे यांनी प्रमुख सहभाग नोंदवला आहे. केशव यांना ७६ दुर्ग भटकंतीचा अनुभव आहे. इतिहास व दुर्ग अभ्यासक तथा शिवुर्जा प्रतिष्ठानचे मुख्य समन्वयक कचरू चांभारे (बीड), धर्मेंद्र सातव (वाघोली पुणे), अंजली प्रधान (नाशिक), जनार्दन पानमंद (कर्जत रायगड), जगन्नाथ चौरे (ठाणे), मच्छिंद्र थोरात (शिरूर, पुणे), जीवन टोपे (खेड, पुणे), कैलास दुरगुडे (पुणे), रमेश गाडे (बीड), महेश गोंडे (पैठण), सुशिला नाईक (नाशिक), वैजनाथ देवाळकर (आंबेजोगाई) यांनी कोरीगड भटकंती मोहिमेत सहभाग घेतला होता. अपंग चळवळीतील अग्रगण्य या १२ शिलेदारांनी कोरीगड, कळसुबाई शिखर, शिवनेरी, लोहगड, हडसर, गोरखगडसह अनेक दुर्ग-गड सर केल्याची माहिती शिवुर्जा प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे यांनी दिली.
कोट
लोणावळा परिसरात हा कोरीगड आहे. गडाची उंची ३०५० फूट आहे. सहाशे पायऱ्या आहेत. गडावर कोराईमाता, गणपती, महादेव मंदिर, गुहा, पाण्याचे दगडी टाके, मुख्य दरवाजा, बुरूज आणि बहरलेले रानफुलांचे ताटवे आहेत.