खासगी चाचण्यांवर रोज वीस लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:05+5:302021-03-31T04:22:05+5:30
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ४ ...
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ४ हजार चाचण्या होत आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात सरासरी २ हजार, तर खासगी रुग्णालयांतही दोन हजारांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. रॅपिड अँटीजनचे प्रमाण कमी असून, त्याद्वारे १५०० ते १८०० चाचण्या होत आहेत. सध्या खासगी रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळा यांचे चाचण्यांचे दर वेगवेगळे आहेत. त्यासाठी १,००० ते १,३०० रुपयांपर्यंत आकारणी केली जाते. खासगी रुग्णालयांमधून किमान चारशे चाचण्या होतात. त्यासाठी नागरिकांना रोज २० ते ३० लाख रुपये मोजावे लागत आहेत.
जिल्हा रुग्णालयामध्ये चार ते पाच दिवसांनी चाचण्यांचे अहवाल प्राप्त होतात. त्यामुळे लवकर अहवाल यावेत यासाठी खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांमधून चाचण्या करण्याकडे नागरिकांचा ओढा आहे.
-------------
दररोज केल्या जाणाऱ्या एकूण चाचण्या - ४,०००
शासकीय प्रयोगशाळांमधील रोजच्या चाचण्या - २,०००
खासगी प्रयोगशाळांमधील रोजच्या चाचण्या - २,०००
--------
एका चाचणीला हजार रुपये
खासगी प्रयोगशाळांमध्ये एका चाचणीसाठी एक हजार ते दीड हजारापर्यंत रक्कम घेतली जाते. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये चाचण्यांचे दर वेगवेगळे आहेत. शासकीय रुग्णालयात मोफत चाचण्या असल्या तरी तेथे अहवाल उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ५० टक्के नागरिक खासगीतूनच चाचण्या करून घेत आहेत.
आठवडाभरात ३२ हजार चाचण्या
आठवडाभरात जिल्ह्यात ३० ते ३२ हजार चाचण्या झालेल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या २ लाख ६४ हजार ५४५ इतकी झाली आहे, तर रॉपिड अँटीजनची संख्या २ लाख ४ हजार ४३६ इतकी झाली आहे. दहा दिवसांत ८ हजारांच्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. चाचण्या केलेल्यांपैकी २५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.
--
डमी नेट फोटोत
२७ कोरोना टेस्टिंग
व्हॅक्सिनेशन