वीस जणांना शहरबंदी

By Admin | Published: August 27, 2014 11:02 PM2014-08-27T23:02:19+5:302014-08-27T23:09:21+5:30

अहमदनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारहाण आणि दंगलीच्या गुन्ह्यातील २० जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

Twenty-two city corporation | वीस जणांना शहरबंदी

वीस जणांना शहरबंदी

अहमदनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारहाण आणि दंगलीच्या गुन्ह्यातील २० जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता गणेशोत्सव काळात शहर बंदीचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी शहराच्या हद्दीतील मारहाण, दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेणे सुरू केले आहे. तब्बल २० जणांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता शहर बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना शहराबाहेर पाठविण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.
कारवाई करण्यात आली त्यांची नावे अशी: विशाल बबन हुचे (वय २३), सागर सुभाष ठोंबरे (वय २०), राहुल सतीश शर्मा (वय २४), अनिल बाबुराव जाधव (वय ३८), नंदू लक्ष्मण बोराटे (वय ३१), करण सुनील ढापसे (वय २३), निलेश जगदीश खांडरे (वय २७), कैलास मधुकर धुपधरे (वय ४१), अमित शिवाजी वराडे (वय २१), रोहित वसंत फड (वय २३), सागर लहानु ढुमणे (वय २४), सूरज सुभाष जाधव (वय २३), अमोल दिलीप साळुंके (वय ३१), शिवकुमार बापू शेळके (वय २३), सचिन सदाप्पा खताळे (वय ३०), स्वप्निल उर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे (वय २४), तबरेज आय्युब तांबुळी (वय ३०), घनशाम दत्तात्रय बोडखे (वय ३०), निलेश किसन भिंगारे (वय २४), पप्पू गुलचरण पंजाबी (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत. ही नावे फक्त कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. तोफखाना हद्दीतील आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फ्लेक्सवरील मजकुरासाठी ‘एनओसी’
गणेशोत्सव काळात शहरात लावल्या जाणाऱ्या फ्लेक्सवरील मजकुराबाबत फ्लेक्स लावणाऱ्यांना पोलीस ठाण्यातील ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. असे प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिकेने फ्लेक्स लावण्यास कोणतीही परवानगी देऊ नये, असे पत्रच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. फ्लेक्सवरील मजकुरावरून कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी अशा प्रकारची एनओसी बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मजकूर दाखविल्याशिवाय आता त्याला परवानगी मिळणार नाही.

Web Title: Twenty-two city corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.