कुकडी प्रकल्पात अडीच टीएमसी पाणी

By Admin | Published: July 11, 2016 12:34 AM2016-07-11T00:34:38+5:302016-07-11T00:53:46+5:30

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी चोवीस तासात कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी आले आहे.

Twenty-two TMC water in the cucumber plant | कुकडी प्रकल्पात अडीच टीएमसी पाणी

कुकडी प्रकल्पात अडीच टीएमसी पाणी

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी चोवीस तासात कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी आले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ४ हजार ६७१ एमसीएफटी (१६ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
कुकडी नदीवरील चिलेवाडी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे येडगाव धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. येडगाव धरणात १ हजार १३७ (४० टक्के) पाणीसाठा झाला असून ३०९ मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. येडगाव धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
माणिकडोह धरणात १ हजार २७७ (१३ टक्के) पाणीसाठा झाला. पाणलोट क्षेत्रात ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडज धरणात २७७ (२४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात २३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४९३ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मृतसाठ्यात ३ हजार १०० एमसीएफटी पाणीसाठा आहे. सोमवारपासून उपयुक्त पाणीसाठ्यात पाणी येईल, अशी आशा आहे. घोड नदीवरील डिंबे धरणात १ हजार ९७७ (१६ टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिलेवाडी तलावात ०६७७ एमसीएफटी पाणी आले आहे. दरवाजे बसविण्याचे काम अपूर्ण असल्याने हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
घोड धरणात पाण्याची आवक
डिंबे धरणाच्या खालील बाजूस चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड नदीला पाणी आले आहे. घोड धरणात सोमवारपासून काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. सध्या घोड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Web Title: Twenty-two TMC water in the cucumber plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.