अडीच हजार शिक्षक बदलीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:19 PM2019-06-02T13:19:35+5:302019-06-02T13:20:51+5:30

लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़

Two and a half thousand teachers are eligible | अडीच हजार शिक्षक बदलीस पात्र

अडीच हजार शिक्षक बदलीस पात्र

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक (उपाध्यापक, पदवीधर, मुख्याध्यापक) या संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे़ सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे व एका शाळेवर तीन वर्ष पुर्ण झालेले, अवघड क्षेत्रात तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा केलेले शिक्षक व महिलांसाठी अवघड क्षेत्रात १ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिका बदलीस पात्र ठरविण्यात आले आहेत़ या बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी अवघड क्षेत्र तसेच अवघड क्षेत्रातील महिलांसाठी प्रतिकूल असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे़ त्यानुसार अवघड क्षेत्रात एकूण ३६८ शळा असून, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळांची संख्या ३४१ आहे़ अवघड क्षेत्रात काम केलेले बदलीस पात्र ठरलेले मराठी माध्यमातील शिक्षक व शिक्षिका यांची संख्या सुमारे ४६२ आहे तर उर्दू माध्यमातील बदलीस पात्र ठरलेले शिक्षक ५ आहेत़
शिक्षकाचा जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्यास, एकच मुत्रपिंड असल्यास किंवा डायलिसीस सुरु असल्यास, कॅन्सरने आजारी असल्यास, मेंदूचा आजार असल्यास, थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक असल्यास अशा शिक्षक किंवा शिक्षिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे़ तसेच ज्या शिक्षकांच्या बदलीसंदर्भात तक्रारी असतील, त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव साळुंके, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीकडे बदलीचा आदेश निघाल्यापासून ७ दिवसात तक्रार लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे़ शिक्षकांच्या या तक्रारीवर ३० दिवसात निर्णय द्यावा, असे सरकारने बदल्यांच्या आदेशात म्हटले आहे़

पती-पत्नी एकत्रिकरणाला सेवाज्येष्ठतेचा खोडा
जिल्हांतर्गत बदलीमध्ये विशेष संवर्ग दोनसाठी पात्र असणारे पती, पत्नी शिक्षक एकाच जिल्हा परिषदेत कार्यरत असल्यास त्यांच्या एकत्रिकरणासाठी सरकारने २८ मे २०१९ रोजी परिपत्रक काढून सेवाज्येष्ठतेची अट टाकली आहे़ मात्र, २७ फेबु्रवारी २०१७ च्या परिपत्रकात पती, पत्नी एकत्रिकरणासाठी सेवाज्येष्ठतेची कोणतीही अट नव्हती़ आता सेवाज्येष्ठतेची अट टाकून दोघांपैकी एकाने अर्ज करावा, असा बदल करण्यात आला आहे़ त्यामुळे सेवाज्येष्ठतेची अट पती-पत्नीच्या एकत्रिकरणाला बाधा आणत असून, ही अट रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे़ याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना निवेदन दिले आहे़ तसेच शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याशीही चर्चा केली़ यावेळी शिक्षक संजय धामणे, गणेश कुलांगे, बाळासाहेब कासार, संभाजी जाधव, सुरेश कोरडे, सुखदेव आठरे, युवराज जाधव आदी उपस्थित होते़

 

Web Title: Two and a half thousand teachers are eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.