अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:50 PM2019-02-10T22:50:21+5:302019-02-10T22:51:08+5:30

राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घमा खिलारी या शेतकऱ्याच्या घासाच्या शेतात ही जखमी मादी पडून होती.

Two-and-a-half-year-old leopard was found, | अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद

अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद

राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणाच्या बॅकवॉटर लगत असलेल्या कुरणवाडी येथे घासाच्या शेतात अडीच वर्षांची बिबट्याची मादी जखमी अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याच्या मादीवर इतर प्राण्यांचा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घमा खिलारी या शेतकऱ्याच्या घासाच्या शेतात ही जखमी मादी पडून होती. घास काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला जखमी बिबट्या नजरेस पडला. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी या घटनेची खबर राहुरी वनविभागाला दिल्याने वनसंरक्षक देवखिळे, उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एम.बी.पोकळे, वनपाल लोंढे, गायकवाड, वनरक्षक खराडे, लांबे, किणकर सह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुरणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने जखमी बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. या  मादीचा मुक्काम राहुरीच्या डिग्रस नर्सरीत आहे.  बिबट्या पुनर्वसन केंद्र माणिकडोह येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून या मादीवर उपचार केले जाणार आहेत. जखमी अवस्थेत आढळून आलेल्या मादीच्या कमरेपासून खालच्या भागावर गंभीर जखमा झाल्या असल्याने हा हल्ला हिंस्र प्राण्यांचा? हा सवाल निर्माण झाला आहे. गेल्या पंधरवाड्यापूर्वी या भागात बिबट्याने दोन शेळ्या ठार मारल्याची घटना घडली होती

Web Title: Two-and-a-half-year-old leopard was found,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.