टाकळी ढोकेश्वरमध्ये शस्त्रे विकणारे दोघे जेरबंद; दोन जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:16 PM2020-06-07T12:16:38+5:302020-06-07T12:18:41+5:30
टाकळी ढोकेश्वर येथे नगर-कल्याण महामागावरील ढोक्री टोलनाक्यानजीक एका वाहनातून शस्त्रास्त्रे विकणाºया दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पकडले. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत.
टाकळी ढोकेश्वर : येथे नगर-कल्याण महामागावरील ढोक्री टोलनाक्यानजीक एका वाहनातून शस्त्रास्त्रे विकणाºया दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पकडले. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत.
नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी टोलनाक्याकडे येणाºया पांढºया रंगाच्या बोलेरो वाहन क्र.एम.एच १६, बी.एच.५९८० या वाहनाला पोलिसांनी थांबवले. यावेळी तलवारीची विक्री करणाºयांना छाप्याची चाहूल लागली असता दोन आरोपी गाडीतून उतरून फरार झाले. तर दोघे गाडी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या दोघांना पोलिसांनी पकडले.
अक्षय संजय पोपळे (वय २७), नजीमुद्दीन बाबुलाल शेख (वय ४१, दोघेही रा. म्हसे, ता.श्रीगोंदा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमनाथ सुरेश पठारे व राजेश रमेश फाळके (रा.म्हसे, ता. श्रीगोंदा) हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.