शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनचे पाइप चोरणारे दोघे अटकेत
By शेखर पानसरे | Published: September 1, 2023 06:07 PM2023-09-01T18:07:03+5:302023-09-01T18:07:21+5:30
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलिस पथकाने तपास करत ठिबक सिंचनचे पाइप चोरणाऱ्या दोघांना पकडले.
संगमनेर : शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाइप चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलिस पथकाने तपास करत ठिबक सिंचनचे पाइप चोरणाऱ्या दोघांना पकडले.
फरदिन इसाक शेख, नवशाद इसाक शेख (दोघेही रा. अकोले नाका, संगमनेर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिस तपासात त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात संगमनेर आणि अकोले तालुक्यांतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. २८ ऑगस्ट ला रात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे शेतातील घरासमोरून तीन-चार चोरटे ठिबक सिंचनचे पाइप पीकअप या चारचाकी वाहनात टाकून चोरून नेत होते.
हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केल्याने चोरटे वाहन सोडून पळून गेले होते. फरदिन शेख आणि नवशाद शेख हे दोघेही सराईत आरोपी आहेत.