गांजाविक्री प्रकरणी श्रीगोंद्यात दोन भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 05:03 PM2017-11-18T17:03:00+5:302017-11-18T17:03:27+5:30
श्रीगोंदा : विक्रीसाठी गांजा घेऊन जाताना श्रीगोंदा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना पकडून त्यांच्याकडून चार किलो, ५०० ग्रॅम गांजा जप्त ...
श्रीगोंदा : विक्रीसाठी गांजा घेऊन जाताना श्रीगोंदा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना पकडून त्यांच्याकडून चार किलो, ५०० ग्रॅम गांजा जप्त केला.
अटकेमध्ये विजय राजाराम साळवे (वय ३५) व त्याचा भाऊ भीमराव साळवे (वय ३०, रा सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी, ता माढा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे दोघे गांजा घेऊन जात असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळील पिशवीत गांजाचे दोन पुडके सापडले. ४५ हजार ८०० रुपये किंमतीचा गांजा व ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा ८५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, हा गांजा कर्नाटक येथून श्रीगोंदा साखर कारखाना परिसरात राहणा-या एका जणाला विक्रीसाठी आणला मात्र सदर व्यक्तिचा मोबाईल बंद असल्याने हे दोघे गावाकडे परतत होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहेत.