झाडाच्या फांद्या तोडण्यावरून दोन कुटुंबांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:50+5:302021-05-05T04:33:50+5:30
कोपरगाव : शेतातील घरावर आलेल्या वेड्या बाभळीच्या फांद्या तोडण्याच्या किरकोळ कारणातून दोन कुटुंबातील महिला-पुरुषांनी एकमेकांस शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी, दगडांनी, ...
कोपरगाव : शेतातील घरावर आलेल्या वेड्या बाभळीच्या फांद्या तोडण्याच्या किरकोळ कारणातून दोन कुटुंबातील महिला-पुरुषांनी एकमेकांस शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी, दगडांनी, लाकडी दांडक्यांनी मारहाण करीत दुखापत केली आहे.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे रविवारी (दि. २ मे) सकाळी ११ ते १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दोन्ही गटातील रतन तुकाराम ढवळे, बाळू तुकाराम ढवळे, भीमाबाई ढवळे, अक्षदा बाळू ढवळे, (सर्व रा. करंजी, ता. कोपरगाव) यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील सदस्यांनी रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
यामध्ये रतन तुकाराम ढवळे (वय ६६, रा. ओगदी, ता. कोपरगाव) यांनी बाळू तुकाराम ढवळे, भीमाबाई बाळू ढवळे (दोघे रा. करंजी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध तर बाळू तुकाराम ढवळे (रा. करंजी, ता. कोपरगाव) यांनी रतन तुकाराम ढवळे, राणूबाई रतन ढवळे, सविता किरण ढवळे, ललिता शंकर ढवळे, किरण रतन ढवळे, शंकर रतन ढवळे (सर्व रा. करंजी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.