भेंडा परिसरात बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:54+5:302021-01-13T04:52:54+5:30
भेंडा : भेंडा कारखान्याच्या परिसरात जेऊर, देवगाव या रस्त्याच्या मधल्या पट्ट्यात असणाऱ्या ओढ्याच्या कडेला गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य ...
भेंडा : भेंडा कारखान्याच्या परिसरात जेऊर, देवगाव या रस्त्याच्या मधल्या पट्ट्यात असणाऱ्या ओढ्याच्या कडेला गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. रविवारी रात्री अरूण भाऊसाहेब मिसाळ यांच्या २ शेळ्या बिबट्याने फस्त केल्या.
पत्र्याच्या दावणीला ३ शेळ्या बांधलेल्या होत्या. दावण शंभर फूट ओढत नेली. तेथे एक शेळी निसटली. त्यामुळे वाचली. बिबट्याने एक शेळी खाल्ल्याचा पंचनामा वन विभागाचे कर्मचारी भीमराज पाठक यांनी केला आहे. दुसरी शेळी उसाच्या शेतात ओढत नेवून फस्त केली.
एका आठवड्यापूर्वी नवनाथ मिसाळ यांच्या ४ कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. पंधरा दिवसांत बिबट्याने ५ शेळ्या फस्त केल्या आहेत. २५ डिसेंबरच्या रात्री तेजस भागवत यांच्या ३ शेळ्यांची शिकार बिबट्याने केली होती. पैकी एका शेळीचा मृतदेह त्यावेळी सापडला नाही म्हणून २ शेळ्यांचा पंचनामा केला होता.
...
रात्री अघोषित संचारबंदी
भेंडा देवगाव रस्त्यावर सोपान दारकुंडे यांना मागील आठवड्यात दोनदा बिबट्यांचे दर्शन झाले. पहाटे कारखान्यावर ड्युटीवर येत असताना ओढ्याजवळ त्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ११ जानेवारीच्या रात्री माळीचिंचोरा येथील बाबुराव शेंडे यांच्या एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला.
सध्या परिसरात रात्रीच्या वेळी अघोषित संचारबंदी लागू आहे.