आश्वी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 03:39 PM2020-08-09T15:39:35+5:302020-08-09T15:51:06+5:30
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे भरवस्तीत बिबट्याने हल्ला करुन दोन शेळ्या ठार मारल्या. ही घटना शनिवारी (९ आॅगस्ट)पहाटे घडली.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे भरवस्तीत बिबट्याने हल्ला करुन दोन शेळ्या ठार मारल्या. ही घटना शनिवारी (९ आॅगस्ट)पहाटे घडली.
आश्वी बुद्रुक येथील इरिगेशन बंगला परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने गावातील कुत्रे फस्त करुन आता शेतकºयांचे पशुधन फस्त करण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अनिस नुरमंहमद शेख यांच्या गोठ्यात ाबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी अनिस यांना जनावरे ओरडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी बाहेर गोठ्यात जावून पाहिले असता बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याचे दिसले. अनिस यांना पाहताच बिबट्याने तेथून धूम ठोकली.
या परिसरात तातडीने वनखात्याने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी
भगवान ईलग,अनिस शेख, भाउसाहेब ताजणे, विनायकराव बालोटे, रविंद्र बालोटे, महेश बालोटे यांनी केली आहे.