मालमत्ता कर प्रकरणी दोन हॉटेल, जिनींग मील सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:01 IST2021-02-14T17:54:07+5:302021-02-14T18:01:14+5:30
प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक जिनिंग मील सील केले.

मालमत्ता कर प्रकरणी दोन हॉटेल, जिनींग मील सील
शेवगाव : प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक जिनिंग मील सील केले.
नगर परिषदेचे कर अधीक्षक, डी. सी. साळवे यांच्या पथकाने, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेवासा रोडवरील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार ६, तर हॉटेल गारवाकडे ५८ हजार ४११, आनंद जिनिंग मिलकडे ३ लाख ८८ हजार ७८९ रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने कारवाई करण्यात आली आहे.
संबंधितांना वारंवार सांगून तसेच नोटीस बजावूनही थकबाकी भरली नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. अशोक सुपरे, गोपी छजलानी, श्रीकृष्ण ढाकणे, दीपक कोल्हे, संजय साखरे, हरिभाऊ शेकडे, केतन मुरदारे या पथकाने कारवाई केली असून कर अधीक्षक डी. सी. साळवे यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांना जप्तीची नोटीस पाठवल्याचे सांगितले आहे.