कोपरगावात शुक्रवारी दोन बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:08+5:302021-01-16T04:24:08+5:30
कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारी (दि. १५ जानेवारी) रॅपिड अँटिजन कीटद्वारे ४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ व्यक्ती बाधित ...
कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारी (दि. १५ जानेवारी) रॅपिड अँटिजन कीटद्वारे ४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. २ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. एकूण २ रुग्ण बाधित आढळले आहेत. १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. १८ व्यक्तींच्या घशातील स्राव हे नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
१५ जानेवारीअखेर २८१७ कोरोनाची लागण झाली. त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ५२ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहे. उर्वरित २७२१ बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तसेच आतापर्यंत तालुक्यातील १९ हजार ५३२ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ३७८ व्यक्तीची नगर येथे स्राव पाठवून, तर १५ हजार १५४ व्यक्तींची रॅपिड अँटिजन कीटद्वारे तपासणी केली असल्याचेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.