औरंगाबाद महामार्गावरील अपघातात दोन ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:56 PM2018-04-10T13:56:38+5:302018-04-10T13:56:49+5:30
नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत.
नेवासा : नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत.
सोमवारी(दि.९) मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा शिवारात नगरच्या दिशेने चाललेल्या कंटेनर (क्र. एम.एच-२०, ए.टी.- ८७८३) ला मागील बाजूस स्वीप्ट कारची (क्र. एम.एच.-२० डीजे-११४३) जोरदार धडक बसल्याने कारमधील लक्ष्मण राजाराम हिवाळे (वय-३३) व संतोष वालचंद सोनवणे (वय-३०, दोघे राहणार रांजणगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश देविदास जाधव (वय-३०) व मनोज गोरक्षनाथ सोनवणे (वय -२२) (दोघे राहणार रांजणगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात स्वीप्ट कारचा चक्काचूर झाला आहे. कंटेनर खाली गुंतलेली कार बाहेर काढण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागला. कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, कॉन्सेबल सुहास गायकवाड, कॉस्टेबल संदीप दरंदले, कॉस्टेबल संभाजी गर्जे, कॉस्टेबल देवा खेडकर, राजेंद्र सुद्रीक यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविले. याबाबत मंगेश बाळाभाऊ हिवाळे यांनी दिलेल्या खबरी वरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.