राहुरी तालुक्यात  कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू; बळीची संख्या तीनवर; देवळालीत चार जणांना कोरोनाची बाधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:47 AM2020-08-07T11:47:51+5:302020-08-07T11:49:14+5:30

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील एक महिला व राहुरी शहरातील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित झालेले एकूण बळींची संख्या तीनवर गेली आहे.

Two killed by corona in Rahuri taluka; The number of victims is three; Four people were stabbed in the temple | राहुरी तालुक्यात  कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू; बळीची संख्या तीनवर; देवळालीत चार जणांना कोरोनाची बाधा 

राहुरी तालुक्यात  कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू; बळीची संख्या तीनवर; देवळालीत चार जणांना कोरोनाची बाधा 

राहुरी : तालुक्यात गुरुवारी ( ६ आॅगस्ट) सहा जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात देवळाली प्रवरा चार तर राहुरी शहरातील २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे.  दरम्यान, राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील एक महिला व राहुरी शहरातील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित झालेले एकूण बळींची संख्या तीनवर गेली आहे.

नगर परिषद हद्दीमध्ये गुरुवारी (६ आॅगस्ट) रोजी राजकीय क्षेत्रातील पितापुत्रांसह दोन महिला कोरोनाबाधित आढळून आले. आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान देवळाली परिसरातील संबंधित रुग्णांची संख्या १९ वर गेली पैकी  १५ रुग्ण बरे होऊन घरी आली. आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे

         देवळाली परिसरातील या दोन व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कातील दोन्ही व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील दोन महिला  बाधित आढळून आल्या आहेत. सर्वांना राहुरी कारखाना येथील श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये  उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.

Web Title: Two killed by corona in Rahuri taluka; The number of victims is three; Four people were stabbed in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.